‘एनबीएफसी’च्या रोख कर्ज वितरणावर मर्यादा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई: रिझर्व्ह बँकेने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या(एनबीएफसी) रोख कर्ज वितरणावर मर्यादा घातली आहे. त्यानंतर आज(शुक्रवार) मुथुट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स यासारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने बिगर वित्तीय बँकिंग संस्थांना रोख कर्ज वितरणाची मर्यादा 25,000 रुपये केली आहे. यापुढे ग्राहकांना सोने गहाण ठेऊन कर्ज घेताना केवळ पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरुपात मिळू शकणार आहे. त्यापेक्षा जास्तीची रक्कम धनादेशमार्फतच देण्याचे निर्देश आरबीआयने जारी केले आहेत. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयेएवढी होती.

केंद्र सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, सरकारकडून लोकांना रोख रकमेच्या वापरापासून परावृत्त केले जात आहे.

यासंबंधी घोषणेनंतर मुथुट फायनान्सच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची घसरण झाली असून मणप्पुरम फायनान्सचा शेअर सुमारे 5.7 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या(11 वाजून 23 मिनिटे) मुथुट फायनान्सचा शेअर 338.25 रुपयांवर व्यवहार करत असून 3.77 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, मणप्पुरम फायनान्सचा शेअर 4.01 टक्क्यांच्या घसरणीसह 91.00 रुपयांवर व्यवहार करत आहे.