‘एसबीआय’कडून रोख व्यवहार, एटीएम वापरावर निर्बंध!

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

नवी दिल्ली: स्टेट बॅंक ऑफ इंडियाने खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास दंड आकारण्याचा निर्णय पाच वर्षांनंतर पुन्हा घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. याशिवाय, बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरदेखील निर्बंध लागू केले आहेत.

नवी दिल्ली: स्टेट बॅंक ऑफ इंडियाने खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास दंड आकारण्याचा निर्णय पाच वर्षांनंतर पुन्हा घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. याशिवाय, बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरदेखील निर्बंध लागू केले आहेत.

देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेली स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे बचत खातेधारक या पुढे महिन्याला फक्त तीन वेळा रोकड खात्यात जमा करू शकणार आहेत. त्यापुढे प्रत्येकी वेळी रोकड जमा करताना त्यांना 50 रुपये अधिक सेवा कर द्यावा लागेल. चालू खाते असल्यास हा अधिभार 20 हजार रुपयांपर्यंत जाईल. खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास दंड म्हणून 100 रुपये अधिक सेवा कर आकाण्यात येईल. महानगरी भागात शिल्लक 5 हजार रुपयांच्या 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाल्यास हा दंड शंभर रुपये अधिक सेवा कर असेल. शिल्लक 50 टक्‍क्‍यापेक्षा कमी झाल्यास 50 रुपये अधिक सेवा कर आकारण्यात येईल. बॅंकेच्या शाखांच्या ठिकाणांनुसार दंडाचे प्रमाण ठरणार असून, ग्रामीण भागातील शाखांसाठी हा दंड कमी असेल. किमान शिल्लक नसल्यास दंड आकारणे 2012 पासून बंद केले होते.

एटीएम वापरावर मर्यादा
बॅंकेचे ग्राहक अन्य बॅंकांच्या एटीएममधून केवळ तीन वेळा पैसे काढू शकणार आहेत. त्या पुढे प्रत्येक वेळी त्यांना 20 रुपये आकारण्यात येतील. बॅंकेच्या एटीएममधूनही ग्राहकांना पाच वेळा नि:शुल्क पैसे काढता येणार आहेत. त्या पुढे प्रत्येक वेळी 10 रुपये आकारण्यात येतील.

Web Title: New SBI cash transaction rules to be implemented from April 1, here's what's new