'नोकिया 3310' मिळणार 3310 रुपयांत

Nokia 3310 available in India from Thursday for Rs 3,310
Nokia 3310 available in India from Thursday for Rs 3,310

नवी दिल्ली - भारतीयांना नव्या स्वरुपातील 'नोकिया 3310' साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची 3,310 रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे.

"नोकिया 3310 देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये 18 मे 2017 पासून उपलब्ध होईल. ग्राहकांना 3,310 रुपयांना हा फोन उपलब्ध करुन दिला जाईल", असे एचएमडी ग्लोबलने सांगितले आहे.

नोकियाने काही महिन्यांपूर्वी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया 3310 नव्या रुपात सादर करण्याची घोषणा केली होती. एकेकाळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली होती.

काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये?

  • तांबडा, पिवळा गडद निळा आणि राखाडी रंगात उपलब्ध.
  • मोबाईलमधून बॅटरी वेगळी करता येणार.
  • 16 जीबी बिल्ट-इन मेमरी, तसेच मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येणार.
  • यूएसबी चार्जरची सोय. हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडिओ.
  • 2  मेगापिक्‍सेल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशची सुविधा.
  • 1200 एमएएच क्षमतेची बॅटरी असल्याने 22 तासांचा टॉकटाइम आणि महिनाभराचा स्टॅन्ड बाय टाइम.
  • ‘ब्ल्यू टूथ कनेक्‍टिव्हिटी’ आणि ‘एमपी थ्री प्लेअर’.
  • 2.4 इंच क्षमतेचा डिस्प्ले आणि 2 जी कनेक्‍टिव्हिटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com