विजय मल्ल्यासह नऊ जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई : किंगफिशर-आयडीबीआय कर्जवाटप प्रकरणात आर्थिक गुन्हे व्यवहार विशेष (पीएमएलए) न्यायालयाने विजय मल्ल्यासह बॅंकेच्या अधिकाऱ्यांविरोधात नव्याने अजामीनपात्र वारंट जारी केले. कर्जवाटपाच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी एकूण नऊजणांविरोधात हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 

अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) याप्रकरणी विजय मल्ल्यासह नऊजणांविरोधात 14 जूनला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने या सर्वांविरोधात अजामीनपात्र वारंट जारी केले. आयडीबीआय बॅंकेच्या 900 कोटींच्या कर्जवाटप प्रकरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी विजय मल्ल्यासह या नऊ जणांविरोधात 57 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

विजय मल्ल्या युनायटेड किंगडममध्ये असल्याची माहिती ऍण्टी मनी लॉण्डरिंग एजन्सीने दिली. त्यानंतर त्याला अटकपूर्व जामिनाबाबत कळविल्यानंतरही तो न्यायालयात अनुपस्थित राहत असल्याचे ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात सांगितले. ईडीच्या या विनंतीमुळे नव्याने वॉरंट जारी केले आहे.