आता सरकारी ऑफिसमध्येच मिळणार आधार कार्ड

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाचे सर्व राज्यांना पत्र

नवी दिल्ली: राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाने आधार नोंदणी करणाऱ्या खासगीसह सर्व संस्थांना सरकारी कार्यालयांच्या इमारतीतच सप्टेंबरपासून कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाचे सर्व राज्यांना पत्र

नवी दिल्ली: राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाने आधार नोंदणी करणाऱ्या खासगीसह सर्व संस्थांना सरकारी कार्यालयांच्या इमारतीतच सप्टेंबरपासून कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत.

देशभरात सध्या 25 हजार आधार नोंदणी केंद्रे असून, त्यावर सरकारी यंत्रणांची थेट देखरेख राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी संस्थांकडून आधारसाठी जास्त शुल्क आकारण्याला यामुळे आळा बसणार आहे. यासोबत आधारमधील अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे. सरकारी कार्यालयांत आधार नोंदणी सुरू झाल्यास नागरिकांना सरकारी योजनांशी आधार जोडणी करणे सोपे जाणार आहे.

याबाबत राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सर्व राज्यांनी पत्र लिहिले आहे. सर्व राज्यांनी आधार नोंदणी कार्यालयांना सरकारी कार्यालयांच्या इमारतीत जागा द्यावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे. जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये, महापालिका यासह अन्य स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आधारसाठी कार्यालये द्यावीत, असे त्यांनी नमूद केले आहे.

नागरिकांना आधार नोंदणी कार्यालये शोधण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये आधार नोंदणी सुरू झाल्यास नागरिकांची गैरसोय कमी होईल. 
- अजय भूषण पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय नागरिकांक प्राधिकरण