आता ‘आधार कार्ड ‘ नसेल तर…

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) सिम कार्डसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रायने याबाबत नुकतेच अध्यादेश जारी की असून मोबाईल सिमकार्ड, ब्रॉडबॅंड सेवा तसेच फिक्‍स लाइन फोनसाठी आता आधार कार्ड देणे अनिवार्य असणार आहे. या आधी सर्वोच्च न्यायालयाने सर्व सिम कार्डना आधार कार्डशी जोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारनेही बाजू मांडताना एका विशिष्ट प्रणालीने सिम कार्ड आधार कार्डला जोडणार असल्याचे सांगितले होते.

ट्रायच्या नव्या आदेशानुसार, आता प्रत्येक सिम कार्डासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. केवळ नव्याच नाही तर जुन्या ग्राहकांनादेखील आपल्या सिम कार्डाचे ई-केवायसी पडताळणी करणे गरजेचे असल्याचे ट्रायने सांगितले आहे.

नियमाचा असाही फायदा
परंतु या नियमाचा फायदा असा होईल एकाच रहिवासी दाखल्यावर संपुर्ण देशभरात सिम कार्ड मिळविता येणार आहे. म्हणजेच तुम्ही दुसऱ्या राज्यातून सिमकार्ड खरेदी करताना रहिवासी दाखला देण्याची गरज लागणार नाही. याशिवाय, केवायसीच्या मदतीने सिमकार्डाचा दुरुपयोग टाळता येईल.

अर्थविश्व

पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या...

09.15 AM

मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ आणि जागतिक पोषक वातावरणाने सोमवारी निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला....

09.15 AM

पुणे - बॅंकिंग फ्रंटियर्सतर्फे सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या आरती ढोले यांना २०१६-१७ या...

09.15 AM