आता दहा दिवसात मिळणार पीएफचे पैसे!

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

नवी दिल्ली: भविष्यनिर्वाह निधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी(पीएफ), निवृत्तीवेतन(पेन्शन) किंवा विम्याचे पैसे अवघ्या दहा दिवसांत मिळू शकणार आहेत. भविष्यनिर्वाह निधी संघटना ईपीएफओनो आपल्या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी पीएफ किंवा इतर दाव्यांसाठी आलेले अर्ज आता वीस दिवसांऐवजी दहा दिवसांमध्ये निकाली काढण्याचे ठरविले आहे. संघटेनेने यासाठी ऑनलाईन सुविधादेखील सादर केली होती. आधार आणि बँक खात्यांशी संलग्न पीएफशी खात्यांसंबंधी दावे तीन तासांच्या आत निकाली काढण्याचा संघटनेचा हेतू आहे.

निरोप समारंभातच मिळणार "पीएफ'
तुम्ही ज्या दिवशी सेवानिवृत्त होणार आहात, त्याच दिवशी निरोप समारंभाचा कार्यक्रम असेल, तर त्याच कार्यक्रमात तुमच्या हातात भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) रकमेचा धनादेश पडणार आहे. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर हक्काचे पैसे मिळविण्यासाठी "पीएफ' कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन महिन्यांनी "पीएफ'ची रक्कम मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना यापूर्वी अर्ज करावा लागत होता. त्यानंतर प्रत्यक्षात हक्काची ही रक्कम पदरात पडण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यातून कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र यामध्ये बदल करण्याचा निर्णय "पीएफ' कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी ते निवृत्त होत आहेत. त्याच दिवशी त्यांना "पीएफ'चा धनादेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी कर्मचारी ज्या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्या महिन्याचा "पीएफ'चा हिस्सा संबंधित संस्थांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करावा. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त होत असलेला (फॉर्म 19) अर्ज भरून पंधरा दिवस आधी "पीएफ' कार्यालयात आणून दिल्यानंतर, तसेच त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची वेळ "पीएफ' कार्यालयास कळविल्यास, संबंधित कर्मचाऱ्यास निरोप समारंभाच्या कार्यक्रमात पीएफ कार्यालयाचे अधिकारी येऊन धनादेश देणार आहेत. मात्र केवायसी भरून दिली नसेल, तर संबंधित कर्मचाऱ्यांना स्वत:ची स्वाक्षरी आणि मालकाची स्वाक्षरी घेऊन तो अर्ज द्यावा लागणार आहे.

Web Title: Now PF money will get 10 days!