“पॅन’ देण्यासाठी बॅंकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

नवी दिल्ली : सर्व खातेदारांचे "पॅन'चे तपशील अथवा "पॅन' नसलेल्यांकडून अर्ज-60 भरुन घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाने बॅंकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली : सर्व खातेदारांचे "पॅन'चे तपशील अथवा "पॅन' नसलेल्यांकडून अर्ज-60 भरुन घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाने बॅंकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कर चुकवेगिरी रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने "पॅन' अथवा अर्ज-60 भरून घेण्यासाठी बॅंकांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर 5 एप्रिलला यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने जानेवारीमध्ये बॅंका, टपाल कार्यालये आणि सहकारी बॅंकांना सर्व खातेदारांचे "पॅन'चे तपशील देण्यास सांगितले होते. "पॅन' नसल्यास खातेदारांकडून अर्ज-60 भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच, नोटाबंदीनंतर बचत खात्यात 2.5 लाख रुपये आणि चालू खात्यात 12.5 लाख रुपयांपेक्षा अधिक जमा रकमेची माहिती देण्यास बॅंका आणि टपाल कार्यालयांना प्राप्तिकर विभागाने सांगितले होते.

Web Title: pan card details submitted date extend on 30 june