जीएसटीमुळे पॅन कार्ड महागले

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

नवी दिल्ली: देशभरात 1 जुलैपासून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाला आहे. परिणामी काही सेवा स्वस्त तर काही महागल्या आहेत. त्यातच आता केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार एकमेकांना लिंक करणे बंधकारक केले आहे. मात्र देशातील बर्‍याच लोकांकडे अजूनही पॅन कार्ड नाही. आता मात्र जीएसटी लागू झाल्याने नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

पॅन कार्ड आणि टॅन कार्डसाठी लागणार्‍या शुल्कात जीएसटीमुळे वाढ झाली आहे. ‘केंद्रीय प्रत्यक्ष करनिर्धारण मंडळ अर्थात सीबीडीटी दिलेल्या माहितीनुसार जीएसटीआधी पॅन कार्ड काढण्यासाठी 96 रुपये आकारले जात होते. आता मात्र जीएसटी लागू झालयानंतर पॅन कार्ड काढण्यासाठी 110 रुपये लागणार आहे.