… तरीही पॅन रद्द होणार नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

नवी दिल्ली: आपले पॅन आणि आधार क्रमांक ज्यांनी जोडलेले नाहीत, अशा नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्राच्या सूचनेनुसार वेळेत ही जोडणी न करणाऱ्यांचे पॅन कार्ड आपोआप रद्द होणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आधार किंवा आधार नोंदणी क्रमांक भरणे बंधनकारकच असणार आहे.

"नागरिकांनी घाबरु नये. त्यांचे पॅन कार्ड 30 जूननंतर आपोआप रद्द होणार नाही.", असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी सांगितले. पॅन कार्ड रद्द करण्यासंबंधी अंतिम तारीख जाहीर केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दोन्ही महत्त्वाचे दस्ताऐवज एकमेकांना जोडण्यासाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. नागरिकांनी अखेरच्या दिवशी प्राप्तिकरच्या वेबसाईटवर गर्दी केली. त्यानंतर, विभागाची वेबसाईट क्रॅश झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे, अनेकांना येणारी अडचण लक्षात घेत ही मुदतवाढ देण्यात आली आहे

देशातील प्राप्तिकर संकलन वाढवण्यासाठी आणि करचुकवेगिरी करणार्‍या लोकांवर लगाम लावण्यासाठी सरकारने येत्या 1 जुलैपर्यंत पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाऊंट नंबर आपल्या आधार कार्डासोबत जोडण्याचे आदेश दिले होते. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार असून ते कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अपात्र असेल असेही सरकारने म्हटले होते. परंतु, आता लगेचच पॅन रद्द होणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.