लिक्विड योजनेतून आयुर्विम्याचा हप्ता!

ayurvima instalment cut now liquid funds
ayurvima instalment cut now liquid funds

काही खर्च असे असतात, की ते आपल्याला वर्षातून एकदाच करावे लागतात. त्यात सोसायटी मेंटेनन्स, आयुर्विमा हप्ता, मोटार विमा हप्ता, महापालिका मिळकत कर, नोकरांना बोनस आदी. अशा खर्चाचे नियोजन दरमहा गुंतवणूक करून केले तर वर्षअखेरीस त्या खर्चाचे ओझे वाटत नाही आणि दरमहा केलेल्या गुंतवणुकीवर व्याजसुद्धा (परतावा) मिळते. उदाहरणार्थ, आपल्या स्थावर मालमत्तेचा मिळकत कर आपल्याला एप्रिलमध्ये द्यावा लागतो. तो समजा, 12,000 रुपये आहे. त्यासाठी बॅंकेत दरमहा 1000 रुपयांचे रिकरिंग डिपॉझिट (आर.डी.) खाते सुरू केले, तर त्यावर 6.50 ते 7 टक्के दराने व्याज मिळेल आणि एप्रिल महिन्यात एकरकमी 12,000 रुपयांचा मिळकत कर भरायला जड जाणार नाही. यापुढे जाऊन, एलआयसी म्युच्युअल फंड, तसेच बिर्ला म्युच्युअल फंडाने खूप छान सोय केली आहे. त्यांच्या लिक्विड फंडात आपण "एसआयपी'द्वारे दरमहा ठराविक रक्कम भरू शकतो आणि ही रक्कम ठराविक कालावधीनंतर आपण दिलेल्या सूचनेनुसार तुमचा (त्यांच्याच कंपनीच्या विमा योजनेचा) आयुर्विमा हप्ता थेट भरण्यासाठी वापरली जाते. थोडक्‍यात, या रकमेतून तुमचा आयुर्विमा हप्ता आपोआप, परस्पर भरला जातो. यामध्ये तुम्ही तिमाही, सहामाही किंवा वार्षिक विमा हप्त्याच्या पर्यायाचा अवलंब करू शकता. "एसआयपी'; तसेच आयुर्विमा हप्ता भरण्यासाठी कोठेही रांग लावावी लागत नाही, की कोणत्या कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही. घरबसल्या एका मोबाईल ऍपद्वारे दोन्ही कामे आपोआप होतात. ही सोय फक्त त्यांच्याच विमा कंपनीच्या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी असून, गुंतवणूकदार दोन्ही ठिकाणी समान असणे आवश्‍यक असते.

या प्रकारात तीन फायदे आहेत - 1) लिक्विड योजनेमध्ये बॅंकेपेक्षा थोड्या अधिक परताव्याचा फायदा. 2) एकदम एकरकमी पैसे न गुंतविता "एसआयपी'द्वारे दरमहा ठराविक थोडी रक्कम गुंतविता येते आणि 3) आयुर्विमा हप्ता आवश्‍यक त्या तारखेला आपोआप भरला जातो.

सध्या एलआयसी म्युच्युअल लिक्विड योजनेमध्ये 7.5 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. हा परतावा स्थिर नसून, बदलत असतो व "सेबी'च्या नियमांप्रमाणे त्यामध्ये मुद्दल अथवा परताव्याची खात्री नसते. असे असूनसुद्धा तुलनात्मकरीत्या लिक्विड योजनांमधील गुंतवणूक सुरक्षित असते, कारण यामधील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही.
-सुहास राजदेरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com