पेटीएमविरोधात पेपलकडून तक्रार दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पेपल आणि पेटीएमच्या लोगोमध्ये पहिला 'पे' हा शब्द गडद निळ्या रंगात असून दुसरा शब्द आकाशी रंग आहे. दोन्ही कंपन्यांच्या ट्रेडमार्कची सुरुवात पे या एका शब्दाने होते. 'पे' हा शब्द लोकांच्या अधिक लक्षात राहण्यासारखा असून पेपलशी मिळताजुळता आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल वॉलेट पेटीएमच्या गतीला आणखी एक ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जागतिक डिजिटल पेमेंट्स कंपनी पेपलने पेटीएमने आपल्या लोगोची नक्कल केल्याचा दावा करत कंपनीवर ट्रेडमार्क कार्यालयात तक्रार दाखल केली. 

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या मागितीनुसार, पेटीएमवरील खटला सिद्ध झाल्यास ट्रेडमार्क उल्लंघन कायद्यांतर्गत कंपनीचा लोगो रद्द होऊन आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या लोगोमध्ये वापरण्यात आलेल्या दोन रंगांमध्ये साधर्म्य असून पेटीएमने आपले अनुकरण केल्याचा पेपलचा दावा आहे. 

पेपल आणि पेटीएमच्या लोगोमध्ये पहिला 'पे' हा शब्द गडद निळ्या रंगात असून दुसरा शब्द आकाशी रंग आहे. दोन्ही कंपन्यांच्या ट्रेडमार्कची सुरुवात पे या एका शब्दाने होते. 'पे' हा शब्द लोकांच्या अधिक लक्षात राहण्यासारखा असून पेपलशी मिळताजुळता आहे. याशिवाय दोन्ही ट्रेडमार्कमधील अक्षरांची रचना व आकार सारखा आहे, असे पेपलने तक्रारीत म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यात पेटीएमला दिल्लीतील ग्राहकांनी सहा लाख 15 हजार रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.