पेट्रोल पंप चालकांचा 16 जूनला देशव्यापी संप

Petrol Dealers Association (AIPDA) have declared June 16 as a 'no purchase day' across country
Petrol Dealers Association (AIPDA) have declared June 16 as a 'no purchase day' across country

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर 16 जूनपासून रोजच्या रोज ठरविले जाणार आहेत, या निर्णयाच्या विरोधात ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (एआयपीडीए) 16 जूनरोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एआयपीडीएने 16 जूनला 'नो पर्चेस डे' जाहीर केला आहे.
 
केंद्र सरकारने इंधनाच्या दैनंदिन किंमत बदलाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा एआयपीडीए शांततापूर्ण मार्गाने त्यांचा निषेध करेल आणि 16 जूनरोजी तेल कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नाही असा इशारा ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी दिला आहे.

विकसित देशांमध्ये इंधनाचे दर रोजच्या रोज ठरवले जातात. तीच पद्धत भारतामध्ये आणण्यात येणार आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. यामुळे भारतातही दररोज इंधनाचे दर बदलतील असा निर्णय सरकारने घेतला आहे. तज्ज्ञांच्या समितीने याबाबत शिफारस केली होती आणि ती सरकारकडून स्वीकारण्यात आली. त्याविरोधात आता एआयपीडीए देशव्यापी संपाचे हत्यार उपसले आहे. या निर्णयाची सुरवातीला 1 मेपासून पॉंडेचरी, विशाखापट्टण (आंध्र प्रदेश), राजस्थानातील उदयपूर, झारखंडमधील जमशेदपूर आणि चंदीगढमध्ये या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानंतर 16 जूनपासून देशभर नवीन निर्णय लागू करण्यात येणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
मोदींचे कोट विकले, तरी कर्जमाफी होईल: संजय राऊत
लोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी

अंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन​
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com