पेट्रोल-डिझेल आजपासून स्वस्त!

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून कपात होणार आहे. इंधन कंपन्यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार, पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.46 रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.53 रुपयांची कपात झाली आहे.

देशातील इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या दर पंधरा दिवसांनी इंधनाच्या किंमतींचा आढावा घेतात. त्यानुसार दर महिन्याच्या पहिल्या आणि 15 व्या तारखेस बदललेले दर जाहीर केले जातात. 5 नोव्हेंबर रोजी दरात किरकोळ बदल करण्यात आले होते. त्यानंतर 10 दिवसांनी नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या वेळी बदललेल्या दरांनुसार, मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 74 रुपयांना मिळत होते. सप्टेंबरपासून पाच वेळा दरवाढ झाल्यानंतर आता प्रथमच दर कपात झाली आहे. पुण्यात पेट्रोल 72.64 रुपयांना मिळत होते.

'आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाची किंमत आणि डॉलरच्या तुलनेतील रुपया विनिमय दर पाहता इंधनाच्या विक्रीतून होणाऱ्या फायद्यातून ग्राहकांनाही फायदा देण्यासाठी ही दरकपात करण्यात आली आहे,' असे 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन'ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

आज मध्यरात्रीपासून बदलणारे दर :
पेट्रोल (प्रतिलिटर)
दिल्ली : 65.93
कोलकाता : 68.67
मुंबई : 72.29
चेन्नई : 65.41
बंगळूर : 72.56
पणजी : 61.59

अर्थविश्व

विविध स्तरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह पुणे शहर रिअल इस्टेट क्षेत्रातील डेस्टिनेशन कसे ठरले यावर सध्याच्या ...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्यांतर्गत ज्या व्यायसायिकांची व्यावसायिक उलाढाल २० लाखांच्या आत असूनही त्यांनी...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017