देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त विकले जात आहे
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Pricesesakal

आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या ३३ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दिल्लीसह बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 च्या पुढे गेले आहेत. यासह कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 113.46 डॉलरवर पोहोचला आहे. तरीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत नाही, ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. (petrol diesel todays update 10th may 2022)

देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील या शहरात

देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त विकले जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचा दर 91.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 85.83 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी येथे 123.47 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. तर सर्वात महाग डिझेल आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 107.68 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Prices
HDFC Bank : चारचाकींसाठी देणार ३० मिनिटांत एक्सप्रेस कार लोन

काही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव खालीलप्रमाणे-

दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर

  • मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

  • नोएडामध्ये पेट्रोल १०५.४७ रुपये आणि डिझेल ९७.०३ रुपये प्रति लिटर

  • लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर

  • पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर

  • पाटण्यात पेट्रोल 116.23 रुपये आणि डिझेल 101.06 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
'रिलायन्स रिटेल' मध्ये 1.5 लाख नवीन नोकऱ्या

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com