पेट्रोलपंप रविवारी बंद ठेवण्यास विरोध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नवी दिल्ली : पेट्रोलपंप चालकांनी घेतलेल्या पेट्रोलपंप दर रविवारी बंद ठेवण्याच्या निर्णयाला पेट्रोलियम मंत्रालयाने कडाडून विरोध केला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने आज याबाबत ट्‌विटरवर म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी केलेले आवाहन नागरिकांनी इंधन बचत करावी यासाठी होते. ते पेट्रोलपंप बंद ठेवण्यासाठी नव्हते.

पेट्रोलपंप बंद ठेवण्याच्या निर्णयास मंत्रालय प्रोत्साहन तसेच परवानगी देणार नाही. पंपचालकांच्या छोट्या संघटनेने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार आहे. यात पंपचालकांच्या मोठ्या संघटना सहभागी नाहीत. दरम्यान, देशातील 80 टक्के पेट्रोलपंप चालक सदस्य असलेल्या ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने रविवारी पंप बंद ठेवणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.