फिलिप्स कंपनीकडून स्पेक्‍ट्रानेटिक्‍स ताब्यात

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

ऍमस्टरडॅम : अमेरिकेतील स्पेक्‍ट्रानेटिक्‍स कंपनी 1.9 अब्ज युरोला (2.16 अब्ज डॉलर)ताब्यात घेण्याची घोषणा वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रातील डच कंपनी फिलिप्सने केली आहे.

या कराराला फिलिप्स कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या करारानुसार स्पेक्‍ट्रानेटिक्‍स कंपनीचे कर्जही फिलिप्स स्वत:कडे घेणार आहे. रक्तवाहिन्या व धमन्यांमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करणारे लेजर व छोट्या औषधी फुग्यांची निर्मिती स्पेक्‍ट्रानेटिक्‍स कंपनी करते.

ह्रदय विकारामध्ये रक्तवाहिन्यात आणि धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. दरम्यान, फिलिप्सने 1.5 अब्ज युरोचे समभाग परत खरेदी करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. ही योजना तिसऱ्या तिमाहीत सुरू होणार असून, ती दोन वर्षे सुरू असेल, असे फिलिप्सने म्हटले आहे.

टॅग्स