‘पॉलिसीबझार.कॉम’ 2018 च्या अखेरीस आयपीओ आणणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई: इन्शुरन्स पॉलिसीची ऑनलाइन माहिती देणारी इन्शुरन्स पोर्ट 'पॉलिसीबझार.कॉम' 2018 च्या अखेरीस प्राथमिक समभाग विक्री करण्याची शक्यता आहे. सध्या इन्शुरन्स पोर्टल्सवर वाचून इन्शुरन्स खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पॉलिसीबझार.कॉम ही विम्यासाठी ऑनलाइन सजेशन देणारे संकेतस्थळ आहे. जाहिरात आणि पॉलिसीची शिफारस यांच्यामुळे पोर्टल्सना मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पॉलिसीबझार.कॉम'ला प्रत्येक महिन्याला प्रत्येक पॉलिसीच्या शिफारसीमागे सुमारे एक लाख रुपये मिळतात. या संकेतस्थळावर दोन पॉलिसीमधील तुलनादेखील करता येते. इन्शुरन्स पोर्टलकडून आलेल्या ग्राहकास पॉलिसी विकली गेल्यास संबंधित पोर्टलला कमिशनच्या पंचवीस टक्के रक्कम मिळते. मात्र इन्शुरन्स पोर्टल्सना जाहिरातील दाखविण्याची परवानगी नाही.

सरलेल्या वर्षात पॉलिसीबझार.कॉमने चालू आर्थिक वर्षात रु.250 कोटींचे उत्पन्न मिळविले होते. तर चालू वर्षात कंपनीला रु.350 कोटींचे उत्पन्न मिळण्याची आशा असल्याचे पॉलसीबझार.कॉमचे मुख्य कार्यकारी यशिष दहिया यांनी सांगितले. सध्या ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पॉलिसीबझारचा हिस्सा 70 टक्के आहे.

टॅग्स