उत्पादन क्षेत्राची पीछेहाट; पीएमआय घसरला

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

पीएमआय तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर  

नवी दिल्ली: नव्या ऑर्डर्स आणि निर्मितीचा वेग मंदावल्याने मे महिन्यात उत्पादन क्षेत्राची काहीशी पीछेहाट झाली आहे. उत्पादन क्षेत्राच्या वाढीचे निदर्शक असणारा खरेदी व्यवस्थापन निर्देशांक(पीएमआय) तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे. मे महिन्यात निक्केई मार्किट इंडिया खरेदी व्यवस्थाप निर्देशांक(पीएमआय) 51.6 पातळीवर पोचला आहे. एप्रिलमध्ये हा निर्देशांक 52.5 एवढा होता.

सुमारे 450 कंपन्यांची आकडेवारी एकत्र करुन उत्पादन क्षेत्राचा पीएमआय तयार केला जातो. निर्देशांक 50 अंशांपेक्षा अधिक पातळीवर जाणे आर्थिक विस्तार सुरू असण्याचे निदर्शक असून, तो त्यापेक्षा खाली आल्यास आर्थिक घसरण होत असल्याचे मानले जाते.

"भारतीय उत्पादन क्षेत्राची मे महिन्यात पीछेहाट झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे एकुण उत्पादन तसेच कंपन्यांना मिळणाऱ्या नव्या कंत्राटांचे कमी झालेले प्रमाण आहे. याशिवाय, निर्यात कंत्राटांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. 

-पॉलिआना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, मार्किट