शेअर बाजारात नफावसुलीचा ‘स्पीडब्रेकर’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजाराने आज(बुधवार) पुन्हा एकदा नव्या उच्चांकी पातळीवर सुरुवात केली. परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या प्रभाव आणि नफावसुलीमुळे काही वेळातच दोन्ही निर्देशांकांमध्ये किंचित घसरण झाली. परंतु, देशातील कंपन्यांचे निकाल, जीएसटी दराविषयी अंदाजबांधणी आणि चांगल्या मॉन्सूनचा अंदाज या बाबींनी ही घसरण रोखून धरली आहे.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 38 अंशांच्या वाढीसह 30,620 अंशांवर उच्चांकी पातळी गाठली. त्याचप्रमाणे, निफ्टीने 9 अंशांनी वधारुन 9,521 अंशांवर नवा उच्चांक गाठला. कालदेखील दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी पातळी गाठली होती. सध्या(9 वाजून 55 मिनिटे) सेन्सेक्स 32.96 अंशांच्या वाढीसह 30,615.56 अंशांवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 1.70 अंशाच्या किरकोळ वाढीसह 9,513.95 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

बाजारा बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, फार्मा, रिअल्टी, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि कॅपिटल गूड्स क्षेत्रात विक्रीच मारा सुरु आहे. बँक निफ्टी 0.25 टक्याने घसरला आहे. परंतु मेटल क्षेत्रात चांगली खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे. आयटी क्षेत्रातदेखील किरकोळ वाढ झाली आहे.

निफ्टीवर टाटा स्टील, अरबिंदो फार्मा, हिंडाल्को, हिरो मोटोकॉर्प आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज् लॅब्स, आयटीसी, एसीसी आणि अंबुजा सिमेंट्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: Profitability in the stock market 'Speedbreaker'