पुणे महापालिकेच्या बॉंडची मुंबई शेअर बाजारात नोंदणी

कैलास रेडीज
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई: पुणे शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी मुनसिपल बॉंडच्या माध्यमातून 200 कोटींचा निधी पुणे महापालिकेने उभारला आहे. या बाँडची गुरुवारी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. यावेळी10 वर्षांच्या कालावधीसाठी 7.59 टक्के दराने कर्ज उपलब्ध झाले असून बाजारातील हा सर्वोत्तम व्याजदर आहे. यामुळे पालिकेची आर्थिक बचत होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, अर्थराज्यमंत्री अर्जुन मेघवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एसबीआय अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, सेबी अध्यक्ष महापौर मुक्‍ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.

पुणे पालिकेच्या बॉंडसाठी 21 संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इच्छा दर्शवली होती. निधी उभारण्यासाठी भांडवली बाजारातील वातावरण पूरक आहे. पत मानांकन संस्थांनी पुणे पालिकेला "ए ए +' मानांकन दिले आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळालेले हे सर्वोत्तम मानांकन असून यातून पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दिसून येते. पुणे पालिकेला गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे.1997 पासून बॉंडच्या माध्यमातून 10 ते 12 स्थानिक स्वराज्य संस्थांनी 1095 कोटी उभारले होते. पुणे पालिकेच्या पहिल्याच टप्प्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. आता कोणत्याही अडथळ्याविना बॉंडच्या माध्यमातून त्यांना थेट बाजारातून निधी उभारता येणार असल्याने स्थानिक कामांसाठी केंद्र सरकारवर अवलंबून रहावे लागणार नाही, असे एसबीआय कॅपचे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष साबळे यांनी सांगितले. पुणे पालिकेच्या बॉंडसाठी एसबीआय कॅपने व्यवस्थापन केले आहे