'DSK डेव्हलपर्स'च्या एमडी व सीईओ पदी शिरीष कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

शिरीष कुलकर्णी हे सिम्बॉयोसिस कॉलेजमधून बी. कॉम. झालेले असून, त्यांना रिअल इस्टेटसह औद्योगिक क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि.च्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून श्री. शिरीष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कंपनीच्या वतीने मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराला कळविण्यात आली आहे.

कंपनीचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक असलेले डी. एस. कुलकर्णी पदावरून पायउतार झाले असून, त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार सोपविण्यात आले. शिरीष कुलकर्णी हे सिम्बॉयोसिस कॉलेजमधून बी. कॉम. झालेले असून, त्यांना रिअल इस्टेटसह औद्योगिक क्षेत्राचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. डी. एस. कुलकर्णी हे या पुढे अ-कार्यकारी रूपात संचालक मंडळाचे व कंपनीचे अध्यक्ष म्हणून कायम राहतील.

दरम्यान, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्सच्या एनसीडींच्या विश्‍वस्तांच्या वतीने (डिबेंचर ट्रस्टी) सुचविण्यात आलेल्या शशांक बी. मुखर्जी यांच्या नावाला संचालक म्हणून नियुक्त करण्यासही मंजुरी देण्यात आली.

Web Title: pune marathi business news dsk new ceo, md shirish kulkarni