कतार एअरवेजलाही अमेरिकेचा दिलासा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

दुबई: दोहा येथून अमेरिकेत जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानांमध्ये प्रवाशांवर अमेरिकेने घातलेली इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांची बंदी उठवण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

दुबई: दोहा येथून अमेरिकेत जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानांमध्ये प्रवाशांवर अमेरिकेने घातलेली इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांची बंदी उठवण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

याआधी एमिरेटस्‌, टर्किश एअरलाइन्स आणि एतिहाद या तीन विमान कंपन्यांवरील अशा प्रकारची बंदी अमेरिकेने उठविली आहे. आखातातील आठ देशांमधील दहा विमानतळांवरून येणाऱ्या विमानातून प्रवाशांना इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे सोबत आणण्यास अमेरिकेने बंदी केली होती. या बंदीत इजिप्त, मोरोक्को, जॉर्डन, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि तुर्कस्तान या देशांचा समावेश होता. कतार एअरवेजने सुरक्षात्मक उपाययोजना वाढवल्याने ही बंदी उठविण्यात आली आहे. परदेशातून अमेरिकेत येणारे प्रवासी आणि त्यांच्या उपकरणांची कडेकोट तपासणी करण्याची पावले अमेरिकेने आता उचलली आहेत.