‘निफ्टी’च्या वाढीची गती मंदावेल?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

गेल्या शुक्रवारच्या दिवसअखेर शेअर बाजाराचा "निफ्टी' निर्देशाक 9197 अंशांच्या पातळीवर बंद झाला होता. तांत्रिक आलेखानुसार, या पातळीपासून वरच्या दिशेने 9250 अंशांवर विरोध पातळी दिसत असून, 9140 व 9070 अंशांवर अनुक्रमे आधार पातळ्या दिसत आहेत. चालू आठवड्यासाठी "निफ्टी'ची पातळी 9070 ते 9250 अंश अशी दिसत आहे. आतापर्यंत "निफ्टी'त 16.5 टक्के सरळ वाढ झाली असल्याने पुढील वाढीची गती मंदावेल, असे संकेत सध्या दिसत आहेत. 9250 अंशांच्या वर "निफ्टी'ला वाढताना विक्रीचा दबाव झेलावा लागेल. "निफ्टी' 9070 अंशांखाली घसरल्यास 8800 अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

गेल्या शुक्रवारच्या दिवसअखेर शेअर बाजाराचा "निफ्टी' निर्देशाक 9197 अंशांच्या पातळीवर बंद झाला होता. तांत्रिक आलेखानुसार, या पातळीपासून वरच्या दिशेने 9250 अंशांवर विरोध पातळी दिसत असून, 9140 व 9070 अंशांवर अनुक्रमे आधार पातळ्या दिसत आहेत. चालू आठवड्यासाठी "निफ्टी'ची पातळी 9070 ते 9250 अंश अशी दिसत आहे. आतापर्यंत "निफ्टी'त 16.5 टक्के सरळ वाढ झाली असल्याने पुढील वाढीची गती मंदावेल, असे संकेत सध्या दिसत आहेत. 9250 अंशांच्या वर "निफ्टी'ला वाढताना विक्रीचा दबाव झेलावा लागेल. "निफ्टी' 9070 अंशांखाली घसरल्यास 8800 अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. चालू महिन्यात 8800 ते 9250 अंशांदरम्यान "निफ्टी' राहण्याची शक्‍यता दिसत असून, कंपन्यांचे तिमाही वा वार्षिक निकाल पाहूनच "निफ्टी'ची 9500 अंशांच्या दिशेने निघण्याची दिशा ठरेल.

खरेदी करण्यासारखे... 
मुरुडेश्वर सिरॅमिक्‍स (सध्याचा भाव : रु. 43, उद्दिष्ट : रु. 85) 
बांधकाम उद्योगाला पूरक साहित्य पुरविण्याचा या कंपनीचा व्यवसाय असून, 177 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली ही कंपनी आहे. बांधकाम क्षेत्राला पुन्हा थोडे चांगले दिवस येण्याची चिन्हे दिसत असून, त्याचा या कंपनीलाही लाभ होईल. प्रतिशेअर 120 रुपयांच्या आपल्या सर्वोच्च भावपातळीवरून प्रतिशेअर 10 रुपयांच्या भावापर्यंत यात घसरण झालेली आहे. त्याचे कारण जून 2012 पासून निरंतर विक्रीत होणारी घट व नफ्याचे घटते प्रमाण हे होते; परंतु निव्वळ नफा आता वाढताच आहे. प्रतिशेअर कमाई वाढल्याने आज हा शेअर खरेदीसाठी उत्तम पातळीवर आला आहे. कंपनीचा विकासदर नकारात्मक संकेत देत असला तरी; पुढील काही दिवसांत निव्वळ नफ्याचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता असल्याने आता हा शेअर खरेदी करण्यास हरकत नाही. शेअर खरेदी करण्यापूर्वी बघायची इतर गुणोत्तरीय प्रमाणे पाहता पीई 89 (क्षेत्रातील उद्योगाचा पीई 37) पीबीव्ही 0.57 आहे. पुढील एका वर्षात या शेअरचा भाव 85 रुपये होण्याची शक्‍यता असून, त्यापुढे 120 रुपयांच्या सर्वोच्च भावपातळीपर्यंतही तो वाढू शकतो.

-राजेंद्र सूर्यवंशी 
 

(डिस्क्‍लेमर: लेखक शेअर बाजाराचे संशोधन विश्‍लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी "सकाळ' सहमत असेलच, असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Web Title: Rajendra Suryawanshi analyses the performance of Nifty index