रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात; कर्ज स्वस्त होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कर्ज स्वस्त होणार 
पतधोरणात रेपो दर पाव टक्का कमी केल्याने बँकांना एमसीएलार दरात कपात करावी लागेल.कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बॅंकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतील. गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होतील. कर्जदारांवरील मासिक हप्त्याचा भार काही प्रमाणात हलका होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई : निर्धारित लक्ष्यापेक्षा चलनवाढ नियंत्रणात असल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली. यामुळे रेपो दर 6 टक्के झाला असून बँकांवर आता कर्जाचा दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंगळवारपासून (ता. 1) सुरू झाली. चलनवाढ नियंत्रणाला प्राधान्य देणाऱ्या "आरबीआय'ने यापूर्वी सलग चार पतधोरणांमध्ये व्याजदर स्थिर ठेवले होते. सध्या घाऊक आणि ग्राहक मूल्यावर आधारित किरकोळ चलनवाढ दर नीचांकावर आला आहे. अन्नधान्यांमधील चलनवाढीने तळ गाठला असल्याने समितीला व्याजदर कपात करणे भाग पडले. ऐतिहासिक नीचांकावर आहे. उद्योग जगताने व्याजदर कमी करण्याची आग्रही मागणी केली होती. 

पतधोरण समितीचे सदस्य रवींद्र ढोलकिया यांनी व्याजदर कपातीची सूचना केली आहे. बॅंकेने किमान अर्धा टक्का व्याजदर कमी करावा, अशी सूचना ढोलकिया यांनी समितीला केली आहे. 

कर्ज स्वस्त होणार 
पतधोरणात रेपो दर पाव टक्का कमी केल्याने बँकांना एमसीएलार दरात कपात करावी लागेल. कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बॅंकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतील. गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होतील. कर्जदारांवरील मासिक हप्त्याचा भार काही प्रमाणात हलका होण्याची शक्‍यता आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: RBI cuts repo rate by 25 bps to 6%, loans may get cheaper