गव्हर्नर पदासाठी हे 7 जण आहेत स्पर्धेत?

वृत्तसंस्था
रविवार, 19 जून 2016

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रीय बॅंकेचे प्रमुख या नात्याने दुसरी टर्म (कार्यकाळ) करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, की 4 सप्टेंबरमध्ये गव्हर्नरपदावरून निवृत्त होत असून, आपण पुन्हा शिक्षणक्षेत्रात परतणार आहोत. राजन हे युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये प्राध्यापक आहेत.

राजन यांनी दुसरी टर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने आतापासूनच या पदासाठी दावेदारी सांगण्यास सुरवात झाली आहे. गव्हर्नर पदासाठी सध्या प्रामुख्याने सात जण स्पर्धेत आहेत. आरबीआयचा नवा गव्हर्नर कोण असेल, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. राजन यांनी 2013 मध्ये 23 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लवकरच राजन यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड होईल, असे म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी सर्वांत आघाडीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य आहेत. तसेच आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल, विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिडी, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला यांची नावे चर्चेत आहेत. या सात जणांपैकी अरुंधती भट्टाचार्य, उर्जित पटेल यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 

अर्थविश्व

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) नेटवर्क पोर्टलवर ऑगस्टमध्ये विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतितास 80 हजार जीएसटीआर-3...

04.33 AM

एसबीआयच्या सर्वेक्षणातील माहिती; खर्च वाढविण्याचे आवाहन  नवी दिल्ली - आर्थिक मंदी ही केवळ तांत्रिक नव्हे तर वास्तवातील असून...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेच्या साठ कोटी रुपयांच्या बनावट कर्जप्रकरणी केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) आठ गुन्हे दाखल केले आहेत....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017