कशी आहे पन्नास रुपयांची नवी नोट पाहा

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

महात्मा गांधी यांची छबी असलेल्या चलनी नोटांची नवी सीरिज निळ्या चकाकीयुक्‍त रंगात (फ्लोरोसन्ट ब्ल्यू) तयार करण्यात आली आहे. नोटेच्या मागील बाजूस हम्पी शिल्पाची आकृती आहे. नवी नोट 66 मिलीमीटर रुंद व 135 मिलीमीटर लांब आहे.

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच 50 रुपयांची नवीन नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नवी नोट सादर करण्यात आली आहे.

महात्मा गांधी यांची छबी असलेल्या चलनी नोटांची नवी सीरिज निळ्या चकाकीयुक्‍त रंगात (फ्लोरोसन्ट ब्ल्यू) तयार करण्यात आली आहे. नोटेच्या मागील बाजूस हम्पी शिल्पाची आकृती आहे. नवी नोट 66 मिलीमीटर रुंद व 135 मिलीमीटर लांब आहे. या नोटेवर गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. 

सध्या बाजारात असलेल्या 50 रुपयांच्या नोटा चलनात कायम राहणार असल्याचेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी दोन हजार आणि पाचशेच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. आता त्यानंतर पन्नासची नोट बाजारात लवकरच दाखल होणार आहे.