आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्‍यता धूसर

Reserve Bank of India
Reserve Bank of India

असोचेमचा अंदाज; डॉलर, कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांचा परिणाम

नवी दिल्ली: भारतातील उद्योग क्षेत्राकडून व्याजदर कपातीची मागणी होत असली, तरी रिझर्व्ह बॅंकेकडून दरकपातीची शक्‍यता धूसर असल्याचा अंदाज "असोचेम'ने वर्तविला आहे. अमेरिकी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे वाढते भाव यामुळे व्याजदर कपात होणे शक्‍य नाही, असेही "असोचेम'ने नमूद केले आहे.

उद्योग संघटना असलेल्या "असोचेम'ने म्हटले आहे, की डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. यातच अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदरात वाढ केली आहे; तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने व्याजदर कपातीसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण झाले आहे. नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आली असून, घाऊक चलनवाढ आणि किरकोळ चलनवाढ कमी झाली आहे. मात्र, या परिस्थितीला सामान्य परिस्थिती म्हणता येणार नाही. पाचशे व हजारच्या सर्व बंद नोटा बॅंकांमध्ये जमा होतील आणि नव्या नोटा वितरणात येईल त्या वेळी परिस्थिती वेगळीच दिसेल. साखर आणि गव्हाचे भावही वाढू लागले आहेत.

अमेरिकी डॉलरचा भाव वाढू लागला असून, परकी भांडवलाचा ओघ भारतातून मोठ्या प्रमाणात बाहेर जाताना दिसत आहे. यामुळे विकसनशील बाजारपेठा आणि त्यांच्या चलनावर ताण येऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढू लागले असून, याचा भारतावर सर्वाधिक परिणाम होईल. भारत हा जगातील सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे. डॉलरचा भाव वधारल्याने देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याने चलनवाढीचा आलेख चढता राहण्याची शक्‍यता आहे, असे "असोचेम'ने नमूद केले आहे.

आधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरत होते आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारत होता. भारतीय अर्थव्यवस्थेला पोषक असलेली ही स्थिती आता पूर्णणे उलट झाली आहे. आयातीचा खर्च वाढणार असून, रुपयाच्या घसरणीमुळे स्थिती आणखी बिघडेल. 
- सुनील कनोरिया, अध्यक्ष, असोचेम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com