बँकेतून आता काढा कितीही पैसे

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

महत्त्वाचे मुद्दे:
20 फेब्रुवारी पासून बचत खात्यातून 50 हजार रूपये काढता येतील
13 मार्च पासून पैसे काढण्याची मर्यादा नसेल

नवी दिल्ली - बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा हटविण्याचा दिलासादायक निर्णय आज (बुधवार) रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) घेण्यात आला.

येत्या 20 फेब्रुवारीपासून बॅंकेतून आता 50 हजार रुपये काढता येणार आहेत. तसेच 13 मार्चनंतर बॅंकेतून बचत खात्यातून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा राहणार नाही, असेही आरबीआयने जाहीर केले आहे. 

याआधी आठवड्यास एटीएममधून आणि बॅंकेतून जास्तीत जास्त 24 हजार रुपये (बचत खाते) काढण्यासच परवानगी होती. तसेच 16 जानेवारी रोजी आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढविली होती. याचबरोबर, आठवड्यास एटीएममधून जास्तीत जास्त 24 हजार रुपये (बचत खाते) काढण्यासच परवानगी देण्यात आली होती. 

आरबीआयच्या या नव्या घोषणेमुळे चलन तुटवड्यामुळे तीन महिन्यांपासून अधिक काळ निर्माण झालेल्या समस्यांशी संघर्ष करत असलेल्या सामान्य जनतेस मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे:
20 फेब्रुवारी पासून बचत खात्यातून 50 हजार रूपये काढता येतील
13 मार्च पासून पैसे काढण्याची मर्यादा नसेल

अर्थविश्व

शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा नवी दिल्ली - बाजार नियंत्रक मंडळ सेबीने आता शेल (बनावट...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

आठवडाभरातील स्‍थिती; सेन्सेक्‍सने १,०११, तर निफ्टीने ३५५ अंश गमावले मुंबई - आठवडाभर शेअर बाजारात झालेल्या पडझडीत बडे शेअर्स...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ  नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017