रिलायन्सकडून ‘पेटीएम’मधील हिस्सेदारीची ‘अलिबाबा’ला विक्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

आज (मंगळवार) मुंबई शेअर बाजारात रिलायन्स कॅपिटलचा शेअर 545.30 रुपयांवर व्यवहार करत असून तो 2.40 रुपयांनी वधारला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे 13,771.01 कोटींचे बाजारभांडवल आहे.

मुंबई: रिलायन्स कॅपिटलने मोबाईल वॉलेट कंपनी 'पेटीएम'मधील एक टक्का हिस्सेदारी अलिबाबा समुहाला विकली आहे. लोकप्रिय डिजिटल कंपनी असलेल्या 'पेटीएम'मधील एक टक्का हिस्सेदारीची सुमारे 275 कोटींना विक्री करण्यात आली आहे.

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने 'पेटीएम'मध्ये ही हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी 10 कोटींची गुंतवणूक केली होती. या व्यवहातून रिलायन्स कॅपिटलला तब्बल 2600 टक्के नफा झाला आहे.

मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर बाजारात चलनाची टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर पेटीएमच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचाला नोटाबंदीचा मोठा फायदा झाला आहे. जानेवारी महिन्यात कंपनीच्या ऑनलाईन पेमेंट्स मंचावरुन तब्बल 5,000 कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले होते. तसेच गेल्या महिन्यात ग्राहकांनी एकुण 20 कोटी व्यवहार केले होते. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सरलेल्या वर्षात पेटीएम पेमेंट्स बँकेची स्थापना करण्यासाठी पेटीएममधील काही हिस्सेदारी विकली होती.

आज (मंगळवार) मुंबई शेअर बाजारात रिलायन्स कॅपिटलचा शेअर 545.30 रुपयांवर व्यवहार करत असून तो 2.40 रुपयांनी वधारला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे 13,771.01 कोटींचे बाजारभांडवल आहे.

शेअर बाजारातील ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा

Web Title: Reliance Capital sells Paytm stake to Alibaba for Rs 275 crore