रिलायन्स सेबीच्या निर्णयाला आव्हान देणार

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजने भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'च्या रिलायन्स पेट्रोलियम प्रकरणातील आदेशाला आव्हान देण्याचे ठरविले आहे. कंपनी आता सिक्युरिटीज अपिलीय लवादाकडे धाव घेणार आहे. कंपनी आणि भागधारकांच्या हिताच्यादृष्टीने हे व्यवहार करण्यात आले असून, सेबीने व्यवहारांचा चुकीचा अर्थ लावत हे आदेश जारी केला आहे, असे मत कंपनीने मांडले आहे.

"आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांशी याबाबत चर्चा करीत आहोत. आम्ही सिक्युरिटीज अपीलीय लवादासमोर या आदेशाला आव्हान देणार आहोत. कंपनी व्यवहारांच्या सत्यतेबाबत आम्हाला खात्री असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.", असे रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

"सेबी'ने "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अन्य बारा कंपन्यांवर शेअर बाजारातील वायदे व्यवहार करण्यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला 447 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. यावर 29 नोव्हेंबर 2007 पासून 12 टक्के व्याज भरावे लागणार असून, हा दंड व व्याज 45 दिवसांच्या आतमध्ये भरावे लागणार आहे.

"इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजविरोधात सुमारे दहा वर्षे खटला सुरू होता. कंपनीने "इनसायडर ट्रेडिंग'मधून 513 कोटी रुपये कमाविल्याचे "सेबी'ने म्हटले आहे. "सेबी'ने रिलायन्स पेट्रोलियम "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी 13 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.