रिलायन्स जिओच्या ग्राहकांचा डेटा हॅक?

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

रिलायन्सने रविवारी या संकेतस्थळाविरुद्ध तक्रार केल्यानंतर ती बंद करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान रिलायन्सने डेटा हॅक झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. या संकेतस्थळावर सर्व 12 कोटी ग्राहकांचा डेटा अपलोड केला होता किंवा नाही हे अजून समोर आलेले नाही.

मुंबई: रिलायन्स जिओच्या सुमारे 12 कोटी ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याचा दावा एका संकेतस्थळाने केला आहे. मात्र या वृत्ताच्या सत्यतेबाबत अजून कोणतेही खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. 'मॅजिकपीके.कॉम' या संकेतस्थळाने जिओ ग्राहकांचा डेटा हॅक झाल्याचे सांगितले होते.

रिलायन्सने रविवारी या संकेतस्थळाविरुद्ध तक्रार केल्यानंतर ती बंद करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान रिलायन्सने डेटा हॅक झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. या संकेतस्थळावर सर्व 12 कोटी ग्राहकांचा डेटा अपलोड केला होता किंवा नाही हे अजून समोर आलेले नाही. जेव्हा या संकेतस्थळा जुने क्रमांक टाकण्यात आले. तेव्हा त्या क्रमांकांशी निगडीत ग्राहकाच्या ओळखीशी संबंधित माहिती समोर आल्याचा दावा माध्यमातून केला जात आहे.

मात्र संकेतस्थळावर दिलेला डेटा अधिकृत नाही. संकेतस्थळावर असलेल्या चुकीच्या माहितीची आम्ही त्यासंबंधित यंत्रणेला माहिती दिली असून संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. संकेतस्थळावर देण्यात आलेली माहिती खोटी असून आमच्या सर्व ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे, अशी माहिती जिओच्या प्रवक्त्याने दिली आहे.

'मॅजिकपीके.कॉम' या संकेतस्थळाने केलेल्या दाव्यानुसार खरोखरच डेटा हॅक झाला असल्यास हा भारतातील आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा डेटा हॅक ठरेल.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
सरताज अझीझ यांनी माझ्या पत्राची दखलही घेतली नाही: स्वराज
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या​
तांत्रिक कारणामुळे 'एनएसई'वरील व्यवहार बंद
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​