जिओकडून आयडिया, एअरटेलला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

देशभरात सध्या रिलायन्स जिओचे सहा कोटीहून अधिक ग्राहक आहेत. रिलायन्सने जिओ वेलकम, हॅपी न्यू इयर असे नवनवीन आकर्षक योजना आणून ग्राहकांना आकर्षित केले आहे.

नवी दिल्ली - मार्चपर्यंत 4 जी मोबाईल ग्राहकांना मोफत इंटरनेट, कॉल व एसएमएससेवा देणाऱ्या रिलायन्स जिओने आज (मंगळवार) व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रतिस्पर्धी आयडिया, एअरटेल आणि व्होडोफोन या कंपन्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हॅलेंटाईन डे निमित्त एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले जाते. रिलायन्स जिओने आणलेल्या स्कीममुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांचे कंबरडे मोडले असताना रिलायन्सकडून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देऊन तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रिलायन्सने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर शुभेच्छा देताना #WithLoveFromJio असेही सांगण्यात आले आहे.

देशभरात सध्या रिलायन्स जिओचे सहा कोटीहून अधिक ग्राहक आहेत. रिलायन्सने जिओ वेलकम, हॅपी न्यू इयर असे नवनवीन आकर्षक योजना आणून ग्राहकांना आकर्षित केले आहे. रिलायन्सवर प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून आरोप करण्यात आला होता, की मोफक सुविधांमुळे त्यांच्या नेटवर्कवर परिणाम होत आहे. 

अर्थविश्व

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली....

06.48 PM

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे...

06.18 PM

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच 50 रुपयांची नवीन नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नवी नोट सादर करण्यात आली आहे...

10.36 AM