रिलायन्स करणार 40 हजार कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

रिलायन्सची ब्रिटिश पेट्रोलियमसह 40 हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रिटिश पेट्रोलियम भारतामध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची (सहा अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. याबाबत रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी माहिती दिली. रिलायन्सच्या केजी-डी 6 ब्लॉकमध्ये तीन ते पाच वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे या वेळी अंबानी यांनी सांगितले. रिलायन्सच्या या गुंतवणुकीमुळे भारताचे नैसर्गिक वायूची आयात कमी होऊन त्याचा फायदा होणार आहे.

याबाबत अंबानी यांनी ब्रिटिश पेट्रोलियम या सहभागीदर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब डूडले यांच्यासह केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. या भेटीनंतर डूडले यांनी भारतामध्ये गुंतवणूक वाढवणार असल्याचे जाहीर केले. याबाबत बोलताना अंबानी म्हणाले, "भारतामध्ये कमी कार्बन असणारे इंधन विकसित करण्याचा आमचा विचार आहे. याचसोबत नैसर्गिक वायूंचे उत्पादन वाढवून ते प्रतिदिन 30 ते 35 दशलक्ष घनमीटर (एमसीएमडी) इतके करण्याचे नियोजन असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. नेक्‍स जनरेशन इंधनासाठी रिलायन्स समूह आणि ब्रिटिश पेट्रोलियम यांनी धोरणात्मक भागीदारी केली असून, ती अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

किरकोळ इंधन व्यवसायात गुंतवणुकीवर लक्ष
रिलायन्स व ब्रिटिश पेट्रोलियम किरकोळ इंधन व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याकडे लक्ष देणार असून, याबाबत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुंतवणुकीसाठी दोन्ही कंपन्यांना आवाहन केले. रिलायन्सकडे सध्या किरकोळ इंधनविक्री परवाना आहे. रिलायन्सचे 1400 पेट्रोल पंप कार्यान्वित आहेत, तर ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीला मागील वर्षापासून भारतामध्ये पेट्रोल पंप सुरू करण्याचा परवाना मिळाला आहे.