अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द करण्याचा विचार नाही: आरबीआय

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई: नोटाबंदीनंतर झालेल्या गैरप्रकारांमुळे अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द होण्यासंबंधीच्या अफवा रिझर्व्ह बँकेनेदेखील(आरबीआय) फेटाळून लावल्या आहेत. बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया सुरु केली नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

बँकेच्या काही शाखांमध्ये नोटा बदलून घेण्याच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यामुळे काही वर्तमानपत्रांमध्ये अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून हे निवेदन देण्यात आले आहे.

टॅग्स