शंभर रुपयांच्या नव्या नोटा आणणार- आरबीआय

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली. त्याऐवजी, दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या.

मुंबई - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) लवकरच शंभर रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली आहे. महात्मा गांधी सिरीज-2005 मधील नोटांप्रमाणेच नव्या नोटांची रचना असणार आहे, असे आरबीआयने सांगितले आहे. मात्र, नव्या नोटांचा आगमनानंतर या मूल्याच्या जुन्या नोटादेखील वापरात राहतील असे आरबीआयने स्पष्ट केले आहे

नव्या नोटेच्या दोन्ही नंबर पॅनल्सवर 'आर' हे इन्सेट लेटर आणि विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेलांची सही असेल. या नोटेवर '2017' हे वर्ष छापले जाईल. या नोटेच्या नंबर पॅनलवरील आकड्यांचा आकार चढत्या क्रमाने असेल. याशिवाय, 'ब्लीड लाइन्स' आणि ओळख पटवण्यासाठी मोठ्या आकारातील खूण ही या नोटेची वैशिष्ट्ये आहेत. 

केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली. त्याऐवजी, दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. यानंतर, आरबीआयने वीस रुपये आणि पन्नास रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्याची घोषणा केली आहे.

अर्थविश्व

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली....

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच 50 रुपयांची नवीन नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ही नवी नोट सादर करण्यात आली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017