पुनरुज्जीवन आराखडा  बॅंकांनी सादर करावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’ घेतलेल्या ११ सार्वजनिक बॅंकांना पुनरुज्जीवन आराखडा २५ मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार यांनी दिली. 

कुमार म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेने २१ पैकी ११ सार्वजनिक बॅंकांवर ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’ घेतली आहे. या बॅंकांना पुनरुज्जीवन आराखडा सादर करावा, असे सांगण्यात आले आहे. यात थकीत कर्जांची वसुली, मालमत्ता विक्री, व्यावसायिक वाढीसाठीच्या उपाययोजना आणि भांडवली मदत याबाबतची माहिती सादर करायची आहे. त्यानंतर सरकारकडून  भांडवली मदतीबाबत विचार केला जाईल.

Web Title: revival plan should be submitted by the banks