दिल्लीत प्राप्तिकर विभागाची धाड; कोट्यवधींच्या जुन्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

या नोटा "पॅक' करण्यासाठी एका विशेष "पॅकेजिंग स्पेशालिस्ट' नियुक्ती करण्यात आली होती. या नोटांचे पॅकेजिंग अशा पद्धतीने करण्यात आले होते; की विमानतळावरील स्कॅनिंग यंत्रेही या नोटा पकडू शकली नाहीत! 

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभाग आणि दिल्ली पोलिस दलाकडून आज (बुधवार) करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सव्वातीन कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. दिल्ली शहरामधील करोल बाग भागामधील एका हॉटेलवर टाकण्यात आलेल्या या धाडीमध्ये पाच जणांना अटकही करण्यात आली. मोठी व्याप्ती असण्याची शक्‍यता असलेल्या या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील एका "हवाला ऑपरेटर'चे हे पैसे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या नोटा "पॅक' करण्यासाठी एका विशेष "पॅकेजिंग स्पेशालिस्ट' नियुक्ती करण्यात आली होती. या नोटांचे पॅकेजिंग अशा पद्धतीने करण्यात आले होते; की विमानतळावरील स्कॅनिंग यंत्रेही या नोटा पकडू शकली नाहीत! अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मोबाईलवरील संभाषण तपासण्यात येत असून; यामधून देशातील इतर हवाला ऑपरेटर्सची माहिती मिळण्याचीही शक्‍यता आहे.

सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचलनालय यांसहित इतर विभागांकडून देशभरातील हवाला ऑपरेटर्सविरोधात व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे.

अर्थविश्व

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

11.39 AM

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

11.39 AM

मुंबई - ‘इन्फोसिस’ची १३ हजार कोटींचे शेअर ‘बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या...

11.39 AM