स्वप्नपूर्तीसाठी ‘सकाळ मनी’

स्वप्नपूर्तीसाठी ‘सकाळ मनी’

बदलत्या काळाची गरज ओळखून आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, ‘सकाळ मनी’ ही खास गुंतवणुकीसाठीची नवी वेबसाइट (www.sakalmoney.com) सुरू झाली असून, ती मराठी; तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असल्याने समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येत आहे. मराठीत अशी सुविधा ‘सकाळ मनी’च्या माध्यमातून प्रथमच सादर केली गेली आहे. याद्वारे सुरवातीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध झाली आहेच; पण त्याचबरोबर म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही वाचायला मिळत आहेत.

या नव्या वेबसाइटवर आपले ऑनलाइन खाते अगदी सोप्या पद्धतीने विनामूल्य सुरू  करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आपल्या वैयक्तिक तपशिलांसह नोंदणी करून आणि ‘केवायसी’च्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे खाते सुरू होणार आहे. हे व्यवहार सुरक्षितपणे आणि तत्परतेने होण्यासाठी ‘सकाळ मनी’ने बाँबे स्टॉक एक्‍स्चेंजच्या स्टार म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मशी सहयोग केला आहे.

ज्यांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे वाटते, अशा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. म्युच्युअल फंडात एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो. मात्र, जोखीम विभागली जावी, यासाठी ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) मार्गाने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. अशी दरमहा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्यासह दीर्घकाळात मोठी संपत्ती जमू शकते. घर, मोटार, मुला-मुलींचे उच्च शिक्षण, लग्नकार्य, परदेशी पर्यटन यांसारख्या आपल्या आर्थिक उद्दिष्टांबरोबरच सेवानिवृत्तीनंतरची तरतूद म्हणूनही याकडे पाहता येते. आपली हीच स्वप्ने साकार करण्यासाठी नव्या रूपातील www.sakalmoney.com ला भेट देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे वेगळेपण?
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सोय असणाऱ्या अनेक वेबसाइट आहेत, मग ‘सकाळ मनी’चे वेगळेपण काय, असा प्रश्‍न अनेकांना पडला असणार. महत्त्वाचे म्हणजे ‘सकाळ मनी’ने आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांशी (एएमसी) सहयोग केला असून, तज्ज्ञ टीमकडून सखोल संशोधन करून त्यांच्या योजनांची निवड करण्यात आलेली आहे. या साइटवर गेल्यानंतर मराठीत ‘तुमचे उद्दिष्ट’ किंवा इंग्रजीत ‘सेट अ गोल’ या टॅबवर क्‍लिक केल्यानंतर वाचकांचे उद्दिष्ट, वय, कालावधी, अपेक्षित रक्कम, चलनवाढ आणि जोखीम घेण्याची क्षमता, अशा गोष्टी जाणून घेऊन गुंतवणुकीची वर्गवारी तत्काळ करून मिळते आणि त्यानुसार प्रत्यक्ष गुंतवणूक करता येते. यासाठी ‘सकाळ मनी’च्या वेबसाइटवर खास ‘ऑटोमेटेड’ यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. 

संधी दोघांना!
‘सकाळ मनी’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांबरोबरच गुंतवणूक सल्लागार (एजंट) म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्यांना संधी मिळत आहे. सध्या अल्पबचत प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी, कंपनी एफडी प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांना आता म्युच्युअल फंडाचे प्रतिनिधी म्हणूनही काम करता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ९८८१०९९२०० या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागेल. तसेच, कार्यालयीन वेळेत ९५९५९८२३३७ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com