सुवर्णरोख्यांच्या विक्रीला सोमवारपासून सुरुवात

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

नवी दिल्ली: सार्वभौम सुवर्णरोख्यांच्या यावर्षीच्या पहिल्या टप्प्यातील विक्रीला सोमवारपासून(ता. 10) सुरुवात होत आहे. यासाठी सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 2,780 रुपये निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. इच्छुक नागरिकांना सुवर्णरोखे खरेदीसाठी 14 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सुवर्णरोख्यांची विक्री करताना आठवड्याचा सरासरी भाव काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिग्रॅमसाठी 2,830 रुपये भाव ठरवण्यात आला आहे. मात्र सरकारने त्यावर 50 रुपयांची सवलत दिली असल्याने प्रतिग्रॅम 2,780 रुपयांना सुवर्ण रोखे मिळणार आहेत.

नागरिकांना प्रत्यक्ष स्वरुपात सोने खरेदीपासून प्रवृत्त करण्यासाठी सरकारने सुवर्णरोख्यांमध्ये गुंतवणूकीची योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरु केली. हे सुवर्ण रोखे आठ वर्षे मुदतीचे आहेत. प्राप्तिकर कायद्यानुसार विक्री केलेल्या सुवर्णरोख्यांचा भांडवली नफा मुदतपूर्तीपश्‍चात करमुक्त करण्यात आला आहे. शिवाय या रोख्यांवर दरवर्षी अडीच टक्के दराने सहामाही (करपात्र) व्याज देण्याची तजवीज आहे. तसेच वीस हजार रुपयांपर्यंतची खरेदी रोख पैसे देऊनही करता येणार आहे.

येथून करा सुवर्णरोख्यांची खरेदी:
कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शेअर बाजार आणि काही निवडक टपाल कार्यालयांत या सुवर्ण रोखे खरेदीचे अर्ज मिळू शकतील.

सुवर्णरोख्यांवर किती व्याज मिळणार?
या सुवर्ण रोख्यांवर वार्षिक 2.75 टक्के दराने व्याज दिले जाईल. हे व्याज दर सहा महिन्यांनी जमा करण्यात येते.

किती गुंतवणूक करता येते?
सुवर्णरोख्यांमध्ये किमान गुंतवणूक एक ग्रॅम पासून कमाल गुंतवणूक 500 ग्रॅमपर्यंत करता येते