इन्फोसिसला ‘राम-राम’ केलेल्या ददलानींचा ‘मार्स’मध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

नवी दिल्ली: इन्फोसिसला 'राम-राम' करणारे संदीप ददलानी हे आता 'मार्स' कंपनीत सहभागी झाले आहेत. 'मार्स' ही जागतिक स्तरावरील 'फुड जायंट' असून ददलानी आता 'मार्स'मध्ये मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून काम बघणार आहेत.

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंपनी परिणामकारकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी ददलानी काम करणार असल्याचे कंपनीने एका निवेदनात असे म्हटले आहे. डिजिटायझेशन वाढविण्यासाठी आता नवीन डिझाईन आणि ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित करणार आहे.

'मार्स'चे स्निकर्स, मिल्की वे, मार्स ड्रिंक्स आणि कोकोवेविया अशी अनेक ब्रॅण्डेड उत्पादने असून कंपनीची 35 अब्ज डॉलर्स विक्री आहे.

ददलानी यांनी इन्फोसिस सोडल्यामुळे इन्फोसिससमोरील आव्हाने वाढली आहेत. कारण इन्फोसिसचे अमेरिकेतील प्रमुख संदीप ददलानी यांच्यावर कंपनीला सॉफ्टवेअर उद्योगातून मिळणार्‍या उत्पन्नावर लक्ष ठेवण्याची थेट जबाबदारी होती. त्यामुळे आता सॉफ्टवेअर उद्योगातून मिळणार्‍या उत्पन्नाच्या आघाडीवर कंपनीसमोर आव्हान उभे राहणार आहे.

नितेश बंगा घेणार ददलानी यांची जागा: ददलानी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची जागा आता नितेश बंगा आणि कर्मेश वासवानी घेणार आहेत. येत्या 15 जुलैपासून दोन्ही अधिकारी आपली जबाबदारी संभाळणार आहेत.