सौदी आरामको आणणार यावर्षीचा सर्वात मोठा IPO

सौदी आरामको आपल्या ट्रेडिंग सब्सिडियरीला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Saudi Aramco IPO
Saudi Aramco IPOsakal

सौदी आरामको (Saudi Arab) जगातील सर्वात मोठा IPO आणणार असल्याचे कळते आहे. सौदी आरामको आपल्या ट्रेडिंग सब्सिडियरीला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करणार असल्याचे सुत्रांकडून समजतंय. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्याचाच फायदा घेण्याचा त्यांचा प्लान आहे. सौदी आरामको या वर्षी हा IPO लाँच करू शकते असे सांगितले जात आहे. सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. त्यात सौदी अरेबिया सरकारची हिस्सेदारी आहे.
सौदी अरामको आपली उपकंपनी अरामको ट्रेडिंग कंपनी (Aramco Trading Company) लिस्टिंग करण्यासाठी अनेक व्यापारी बँकांशी बोलणी करत आहे. यामध्ये गोल्डमन सॅक्स ग्रुप, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी आणि मॉर्गन स्टॅनली यांचा समावेश आहे. अरामको ट्रेडिंगचे मूल्यांकन 30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असू शकते. (Saudi Aramco to launch biggest IPO of the year)

Saudi Aramco IPO
तुमच्याकडे इंडियन ऑईलचे शेअर्स आहेत का ? मग ही बातमी नक्की वाचा...

सौदी अरामको तिच्या उपकंपनीतील 30 टक्के हिस्सा विकू शकते. अशा प्रकारे या वर्षातील सर्वात मोठ्या IPO मध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकतो. या वर्षी जानेवारीमध्ये, दक्षिण कोरियाच्या एलजी एनर्जीने (LG Energy) IPO द्वारे सुमारे 10.8 अब्ज उभे केले होते.

सौदी अरामको सध्या तिच्या उपकंपनीच्या यादीचे फायदे आणि तोटे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन स्टॅनलीच्या प्रतिनिधींनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला. अरामको ट्रेडिंग आणि सौदी अरामकोच्या प्रवक्त्यांनीही याबाबत काहीच भाष्य केले नाही.

मिडल-ईस्टच्या ऊर्जा कंपन्यांना तेलाच्या किमतीत झालेल्या तेजीचा फायदा घ्यायचा आहे. मध्यपूर्वेतील देशांची सरकारे तेलावरील अवलंबित्व कमी करू इच्छितात. त्यांना परदेशी गुंतवणूकदारांना त्यांच्या देशात आकर्षित करायचे आहे. ब्लूमबर्ग न्यूजने गेल्या महिन्यात वृत्त दिले होते की सौदी अरामको आपली रिफायनरी कंपनी लुबेरेफ स्टॉक एक्सचेंजवर लिस्टींग करण्याचा विचार करत आहे.

सौदी अरामकोच्या अनेक उपकंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. यामध्ये केमिकल कंपनी सौदी बेसिक इंडस्ट्रीज कॉर्प आणि रॅबिग रिफायनिंग अँड पेट्रोकेमिकल कंपनीचा समावेश आहे. यूएई तेल कंपनीनेही हीच रणनीती वापरली आहे. त्‍याने त्‍याच्‍या ड्रिलिंग आणि फर्टिलायजर कंपन्यांची शेअर बाजारात गेल्या वर्षी लिस्ट केली आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com