एसबीआयमध्ये 10,300 लोकांना रोजगाराची संधी

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे सुमारे 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत. मात्र बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मार्च 2019 अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँक (पीएसबी)  10,300 नवीन कर्मचार्यांची भरती करणार आहे.

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे सुमारे 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत. मात्र बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. मार्च 2019 अखेरपर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँक (पीएसबी)  10,300 नवीन कर्मचार्यांची भरती करणार आहे.

एसबीआयचे कॉर्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''चालू वर्षात 2,000 प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) आणि 8,300 लिपिक कर्मचार्यांची भरती करणार आहोत, ज्यापैकी 1,100 आरक्षित वर्गातील असून त्याची भरती करणे अनिवार्य आहे.'

अधिक आर्थिक घडामोडी जाणून घेण्यासाठी : www.sakalmoney.com ला भेट द्या.

कुमार म्हणाले की, कमीत कमी 12,000 कर्मचारी सेवानिवृत्त होत असून मुख्य एसबीआयमध्ये विलीन झालेल्या सहयोगी बँकांचे 3,500 कर्मचार्यांनी सेवानिवृत्ती योजनेची (व्हीआरएस) निवड केली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बँकेतील कर्मचारी संख्या 2,79,803 होती. ती मार्च 2018 च्या अखेरपर्यंत  2,64,041 वर पोचली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेतील कर्मचाऱ्यांचा खर्च 35,691 कोटी रुपयांवरून कमी होऊन 35,411 कोटी रुपयांवर आला आहे.

डिजिटायझेशन आणि ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानामुळे बँकेचे कामकाज सुधारण्यास मदत होणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.

बुडीत कर्जे , बॉण्डची सुमार कामगिरी आणि सहयोगी बँकांचा भार सांभाळणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला. देशातील मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या बुडीत कर्जामध्ये गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात बँकेने बुडीत कर्जांकरिता 66 हजार 58 कोटींची तरतूद केली. बॅँकेला वर्षभरात 2 लाख 65 हजार 100 कोटींचा महसूल मिळाला असून यात गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ घट झाली. चौथ्या तिमाहीत बँकेला 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला.

Web Title: SBI to hire 10,300 employees this year as workforce reduced by 15,700 in FY18