एसबीआय कर्मचारी कपात करणार?

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने येत्या दोन वर्षात दहा टक्के कर्मचारी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून आता स्टेट बॅंकेच्या सहयोगी बँकांचे एसबीआयमध्ये विलीनीकरण होणार आहे.

त्यामुळे बँकाच्या खर्चात वाढ होणार आहे. मात्र बॅंकेने खर्चात कपात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

''आधुनिक तंत्रज्ञाच्या वापरामुळे रोजगारात घट होण्याची शक्यता बॅंकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात दोन वर्षात दहा टक्क्यांपर्यंत कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितले.

देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयमध्ये सध्या दोन लाख सात हजार कर्मचारी कार्यरत असून 1 एप्रिलनंतर सहा सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचारी संख्येत सत्तर हजारांची भर पडणार आहे. मात्र नजीकच्या काळात विलीनीकरणाचा बँकेला फायदा होणार असून खर्चात बचत होण्याची शक्यता देखील आहे.

बँकेत कर्मचारी भरतीची प्रक्रिया थांबविण्यात नसली तरी प्रतिवर्षी भरतीचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी करण्यात येईल, असेही रजनीश कुमार यांनी यावेळी सांगितले.