रोख्यांच्या विक्रीतून एसबीआय दीड अब्ज डॉलरचे भांडवल उभारणार

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

नवी दिल्ली:  भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) व्यवसाय विस्तारासाठी परदेशात कर्जरोख्यांची विक्री करुन दीड अब्ज डॉलरचे भांडवल उभारण्याची घोषणा केली आहे. पु पुढील आर्थिक वर्ष संपेपर्यंत एक किंवा अनेक टप्प्यात भांडवल उभारण्यास बँकेच्या केंद्रीय कार्यकारी समितीने मंजुरी दिली आहे. या कर्जरोख्यांची मुदत साडेपाच वर्षे असणार आहे.  याशिवाय, समितीने सहयोगी बँकांच्या पात्र भागधारकांना 13.63 कोटी शेअर्सचे वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.

मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर काल(शुक्रवार) 276.05 रुपयांवर व्यवहार करत तो 7.55 रुपये अर्थात 2.81 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात रु.148.30 रुपयांची नीचांकी तर 288.50 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे रु.220,108.59 कोटींचे बाजारभांडवल आहे.