कर्जमाफी दिल्यास बँकांना रु.27,420 कोटींचा फटका – एसबीआय

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई: भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता उत्तरप्रदेशात भाजप 403 जागांपैकी 325 जागांवर निवडून येऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे योगी सरकारने आश्वासनाची पूर्तता करण्याचे ठरवल्यास बँकांना रु.27,420 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास याचा सर्वात मोठा फटका स्टेट बॅंकेला बसणार आहे. महाराष्ट्रातील कर्जमाफीबदद्ल देखील एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधत्ती भट्टाचार्य यांनी विरोध दर्शवला आहे.

उत्तरप्रदेशात सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मिळून शेतकऱ्यांना 86,241.20 कोटींचे कर्जवाटप केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 31 टक्के कर्ज थेट छोट्या आणि सीमांत शेतक-यांना देण्यात आले आहे. ज्यांची शेतजमीन धारण क्षमता 2.5 एकरहून कमी आहे.

जागा लढत विजय संपादन केला. मात्र विजयानंतर आता योगी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आपले आश्वासन पूर्ण केले, तर बँकांचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे बँका डबघाईला येणार आहेत. सरकारकडून लहान शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात कर्जमाफी लागू केल्यास या सरकारला 27 हजार 419.70 कोटी रुपयांचे कर्ज माफ करावे लागेल.

आता विरोधी पक्षांनी देखील भाजपने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी केली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील सरकारच्या कर्जमाफी घोषणेची आम्ही वाट पाहत असल्याचे सांगितले.

सध्या मुंबई शेअर बाजारात स्टेट बॅंकेचा शेअर 271.35 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 2.65 रुपयांची घसरण झाली आहे.