सेन्सेक्स 100 अंशांनी वधारला; निफ्टी तेजीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजार आज(गुरुवार) पुन्हा सावरला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील साइडवेज् व्यवहारांमुळे या वाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 100 अंशांनी वधारला असून निफ्टीने 9050 अंशांच्या पार स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या(10 वाजता) सेन्सेक्स 69.75 अंशांच्या वाढीसह 29,237.43 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,049 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 18.55 अंशांनी वधारला आहे.

आठवड्याच्या चौथ्या दिवशीदेखील रुपयाचे मूल्य वधारले आहे. आज डॉलरच्या तुलनेत चार पैशांनी वधारुन 65.40 पातळीवर रुपयाची सुरुवात झाली.

मुंबई शेअर बाजारात कॅपिटल गूड्स आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रात एक टक्क्याहून अधिक वाढीसह व्यवहार सुरु आहे. याशिवाय, एफएमसीजी, मेटल आणि बँकिंगसह इतर सर्वच क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण दिसून येत आहे. निफ्टीवर गेल, लार्सेन, बीपीसीएल, आयडिया सेल्युलर आणि टाटा मोटर्स(डीव्हीआर) चे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर आयटीसी, आयशर मोटर्स, येस बँक, भेल आणि बॉशचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: sensex 100 pints up now