बाजार तेजीत; सेन्सेक्समध्ये 110 अंशांची वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीसह झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 100 पेक्षा अंशांनी वधारला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने 9150 अंशांची पातळी पार केली आहे. एप्रिल श्रेणीतील एफ अँड ओ करारसमाप्ती जवळ आली आहे. यामुळे कदाचित हा सूर बदलण्याची चिन्हे आहेत.

सध्या(9 वाजून 58 मिनिटे) सेन्सेक्स 110.01 अंशांच्या वाढीसह 29,475.31 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,153.90 पातळीवर व्यवहार करत असून 34.50 अंशांनी वधारला आहे.

आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि मेटल क्षेत्रात किरकोळ घसरण झाली आहे. याऊलट, बँकिंग, कॅपिटल गूड्स, ऑईल अँड गॅस आणि ऑटो क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून येत आहे. याशिवाय, सिमेंट कंपन्यांच्या शेअर्समध्ये विशेष तेजी निर्माण झाली असून काही ठराविक फार्मा कंपन्यांचे शेअर्स कोसळले आहेत.

निफ्टीवर एसीसी सिमेंट्स, ग्रासीम, अंबुजा, सिमेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर ल्युपिन, सिप्ला, भारती एअरटेल, अरबिंदो फार्मा आणि टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.