सेन्सेक्‍समधील घसरण थांबली 

पीटीआय
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्‍स) सुरू असलेली घसरण बुधवारी थांबली. सेन्सेक्‍समध्ये 69 अंशांनी वाढ होऊन तो 28 हजार 292 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) 38 अंशांची वाढ होऊन तो 8 हजार 745 अंशांवर बंद झाला. 

युरोपीय बाजारातील सकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजारात आज आशादायी वातावरण निर्माण झाले. बांधकाम, बॅंकिंग आणि वाहननिर्मिती कंपन्यांच्या समभागात आज चांगली वाढ नोंदविण्यात आली. रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण पुढील आठवड्यात आहे. नवे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि सहा सदस्यीय समितीकडून ठरविले जाणारे हे पहिले पतधोरण आहे. या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. मागील तीन सत्रांत सेन्सेक्‍समध्ये 550 अंशांची घसरण झाली आहे. 

टाटा स्टीलच्या समभागात आज सर्वाधिक 3.25 टक्के वाढ नोंदविण्यात आली. त्याखालोखाल भारती एअरटेल, अदानी पोर्टस्‌, एसबीआय, ओएनजीसी, टाटा मोटर्स, ऍक्‍सिस बॅंक, बजाज ऑटो, एल ऍण्ड टी, पॉवर ग्रिड, एम ऍण्ड एम, आयटीसी लिमिटेड, गेल, एचडीएफसी लिमिटेड आणि एनटीपीसी यांच्या समभागात वाढ झाली.