सेन्सेक्स 200 अंशांनी कोसळला; निफ्टी 9100 पातळीच्या खाली

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई: आशियाई बाजारातील घसरणीनंतर देशांतर्गत शेअर बाजारात तीव्र घसरण झाली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 200 अंशांनी कोसळला होता तर निफ्टीने 9100 अंशांखालची पातळी गाठली. सध्या(10 वाजता) सेन्सेक्स 198.69 अंशांच्या घसरणीसह 29,286.76 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,056.85 पातळीवर व्यवहार करत असून 64.65 अंशांनी घसरला आहे.

बाजारात सर्वत्र घसरणीचा कल दिसून येत आहे. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली असून विशेषतः मेटल क्षेत्रात सर्वाधिक घसरण दिसून येत आहे. याशिवाय, बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रात एक टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे.

निफ्टीवर एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, झी एन्टरटेनमेंट आणि इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर भारती एअरटेल, हिंडाल्को, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि भेलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.